32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरसोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन

सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन

सोलापूर : सोलापूर इतिहास संशोधन मंडळ व ए. आर. बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाचे १७ वे अधिवेशन पार पडले. उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार यशवंत माने होते.

अधिवेशनासाठी ‘भारतीय इतिहास पुरातत्त्व शास्त्र आणि पर्यटन यांच्यासमोरील नवीन आव्हाने व संधी’ या विषयाला अनुसरून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील एकूण ७६ इतिहास संशोधकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये ४२ संशोधकांनी आपल्या संशोधनात्मक शोधनिबंधांचे वाचन केले.

प्रमुख वक्ते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, टी. एस. पाटील, डॉ.चंद्रकांत कोलीगुड्डे, डॉ. सोपान शेंडे, मनोज कसबे, डॉ. किशोर जोगदंड, डॉ. किशोर थोरे, डॉ. विकास शिंदे यांनीमार्गदर्शन केले. यावेळी श्रीनिवास कोंडी, सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सोपान जावळे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विष्णू वाघमारे, प्राचार्य तुकाराम शिंदे, डॉ. अ‍ॅनी जॉन, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. रविकिरण जाधव, डॉ. आप्पासाहेब बिरूनिके, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. दिगंबर वाघमारे, डॉ. अमिता जावळे, डॉ. रविकरण कांबळे, डॉ. सज्जन पवार, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. आशिष रजपूत, डॉ. भागवत गजधाने, डॉ. वटाणे, डॉ. प्रेमचंद गायकवाड, प्रा. सुरेखा बत्तूल उपस्थित होते. डॉ. राजे, डॉ. सोनाली गिरी यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रा. विकास शिंगे यांनी आभार प्रदर्शन केले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR