28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात भाजपविरोधात पोस्टरबाजी

राज्यात भाजपविरोधात पोस्टरबाजी

मुंबई : प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून याची झळ राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजपच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपच्या विरोधातील या पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र दाखवण्यात आले आहे. तसेच ‘तुम्ही उपाशी भाजप तुपाशी’ अशी टॅगलाईन देखील या पोस्टर्सवर लिहिण्यात आली आहे. मुंबईपासून संपूर्ण राज्यभरात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. काँग्रेसच्या वतीने या पोस्टर्सद्वारे महागाईविरोधात सरकारला घेरण्यात आले आहे. यामुळे आता भाजप वि. काँग्रेस अशी चांगलीच जुंपण्याची शक्यता दिसत आहे.

भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी
भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस जनतेला लुटणारे पाकीटमार असा हल्लाबोलही या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, हिंगोली, अहमदनगरसह राज्यभरात पोस्टर लागली आहेत. सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसल्याने जनतेचा संताप पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR