31.4 C
Latur
Thursday, April 10, 2025
Homeनांदेडलाच प्रकरणात डॉक्टर पतीसोबत पत्नीला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

लाच प्रकरणात डॉक्टर पतीसोबत पत्नीला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

नांदेड : प्रतिनिधी
लाच घेतांना पकलेल्या डॉक्टर पतीला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणा-या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धाराशिव येथील वैद्यकीय अधिकारी तथा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड येथील अर्पण रक्तपेढी तपासणीसाठी आल्या होत्या. रक्तपेढीतील त्रुटी न काढण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यातील १० हजार रुपये अर्पण रक्तपेढीने ७ मार्च रोजीचे दिले.

दुस-या दिवशी जागतिक महिला दिनी उर्वरीत १ लाख रुपये लाच घेण्यासाठी अश्र्विनी गोरे यांचा नवरा डॉ. प्रितम तुकाराम राऊत याने अर्पण रक्तपेढीवाल्यांना पोलीस अधिक्षक कार्यालया समोर बोलवले. अर्पण रक्तपेढीवाल्यांनी पंचासमक्ष याच माणसाला पैसे द्यायचे काय? अशी विचारणा डॉ.अश्र्विनी गोरे यांना केली. होकार मिळताच ५० हजार रूपये लाच घेतल्यावर पती डॉ. राऊत अटक झाली. तर पोलिस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, राजेश राठोड, प्रकाश मामुलवार, उल्का जाधव आदींनी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे यांना शनिवारी अटक केल्यावर रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे याचे सादरीकरण केले. पोलीस कोठडी न मिळावी म्हणून डॉ.अश्र्विनी गोरे यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप पवार यांनी सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी डॉ.अश्र्विनी गोरेला १४ मार्च अर्थात चार दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR