लातूर : प्रतिनिधी
लातूरला स्वत्रंत विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीसाठी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती लातूरच्या वतीने ििद. ७ डिसेंबर रोजी येथील महात्मा गांधी चौकात उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले. लातूरकरांच्या अग्रही मागणीतून विकासरत्न विलासराव देशमुख यांनी २००७ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकें्रद पेठ लातूर येथे आणले. लातूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अनुदानीत, विनाअनुदानीत महाद्यालयांची संख्या ११८ तर विद्यार्थी संख्या ५५ हजार ४१० आहे.
लातूर शहरात एकुण ४० महाविद्यालये आहेत. या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरुप लक्षात घेता प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आजही विविध शैक्षणिक कामासाठी लातूर ते नांदेड प्रवास करतात. लातूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशभरात शैक्षणिक लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. त्यामुळे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांची शैक्षणिक, प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी सातत्याने आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने २०१४ पासून निकषांच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वत्रंत्र विद्यापीठाची मागणी करीत आहे. त्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. निकषानूसार लातूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी दुर होणार आहेत. तरी लातूरला स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे, या मागणीसाठी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने गुरुवारी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.