29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeलातूरलोकसभा निवडणूक प्रक्रियेवर विविध २८ पथकांची नजर 

लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर विविध २८ पथकांची नजर 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना दि. १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्या अनुषंगाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी या निवडणुक  प्रक्रियेवर विविध २८ पथकांची करडी नजर असणार असून निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. भारत कदम, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर फलाईंग स्कॉड, स्टॅटीक सर्व्हलन्स टीम, व्हीडीओ सर्व्हलन्स टीम आदी एकुण २८ पथकांची करडी नजर असणार आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दि. १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. दि. २० एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.
दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. दि. ७ मे रोजी मतदान होणार असून दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनी सांगीतले.
 लातूर लोकसभेच्या निवडणुकीत महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, ७५ टक्क्यांपर्यंत मतदान व्हावे त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच विविध सण, उत्सव, जयंत्यांमध्येही जनजागृती करण्यात आली आहे. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. मतदानामध्ये किमान ‘डिस्टींगशन’ गाठण्याचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींचा तत्काळ निपटारा केला जात आहे.
आतापर्यत २५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १७ तक्रारींत तथ्य आढळून आले नाही तर इतर तक्रारी या मालमत्तेशी संबंधीत होत्या. आजघडीला एकही तक्रार प्रलंबीत नाही. लातूर लोकसभेची निवडणुक भयमुक्त आणि पारदर्शक व्हावी, या दृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. बांबुचा वापर करुन पर्यावरणपुरक मतदान बुथ असणार आहेत. परदानशीनही बुथ असणार आहेत, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घूगे म्हणाल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लागुन असल्यामुळे लातूर-बीदर पोलीस समन्वयाने कामकाज करीत आहेत. त्या अनुषंगाने विविध ९ बॉर्डर पॉइंटवर वाहनांची चोख तपासणी केली जात असल्याचे नमुद करुन
आजपर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR