33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपैलवान चंद्रहार आखाडा जिंकणार?

पैलवान चंद्रहार आखाडा जिंकणार?

 

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या रुपाने कुस्तीच्या आखाड्यातील यशवंत मल्ल सांगलीची लोकसभा निवडणूक लढवत आहे. विधानसभा आणि लोकसभेसारख्या मोठ्या आखाड्यात जिल्ह्यातील मोजक्या मल्लांनी आपले नशीब अजमावले. त्यात बिजलीमल्ल संभाजी पवार आणि खासदार संजय पाटील हे सर्वांत यशस्वी पैलवान मानले जातात.

खासदार संजय पाटील कुस्तीपेक्षा राजकीय आखाड्यात अधिक यशस्वी झाले. हिंदकेसरी मारुती माने राज्यसभेत गेले; मात्र त्यांना लोकसभेची कुस्ती ज्ािंकता आली नाही.

खासदार संजय पाटील हे कुस्तीपेक्षा अधिक राजकारणात प्रभावी ठरले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून त्यांची राजकीय कमान चढती राहिली आहे. मात्र राजकारणात संजय पाटील, संभाजी पवार आणि मारुती माने यांच्याइतके यश अन्य मल्लांच्या नशिबी आले नाही.

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, वनश्री नाना महाडिक, डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, भारतभीम ज्योतिरामदादा सावर्डेकर, कडेगावचे साहेबराव यादव, भीमराव माने, किसनराव पाटील यांच्यासह अनेक मंडळी राजकीय आखाड्यात प्रभावी ठरली.

चंद्रहार पाटलांसाठी नवा डाव
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील जिल्हा परिषद सदस्य होते, मात्र जिल्हा परिषदेच्या कारभारात त्यांना फार वेळ देता आला नव्हता. तेव्हा ते कुस्तीच्या आखाड्यात व्यस्त असायचे. आता ते थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्यासाठी हा मोठा डाव आहे; मात्र शिवसेनेचे बळ पाठीशी आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे. हा पैलवान या आखाड्यात यश मिळवतो का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR