28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeधाराशिववडिलांसाठी ओमराजे झाले भावूक

वडिलांसाठी ओमराजे झाले भावूक

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत वडिलांवर विचारलेल्या प्रश्नानंतर भावूक झाले. मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात थेट लढत असून तिस-या टप्प्यात (७ मे) रोजी मतदान पार पडले. प्रचारादरम्यान ओमराजे यांच्या वडिलांवरून जी टीका झाली त्यावरून ओमराजे भावूक झाल्याचे दिसून आले.

विरोधकांकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेबद्दल ते म्हणाले की, माझ्या वडिलांची हत्या झालेली आहे. मी हा विषय प्रचारात घेतला नव्हता. पण त्याच्याबद्दल समोरून जाणीवपूर्वक अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलले गेले. एखाद्या व्यक्तीने आपल्याला आई-वडिलांवरून शिवी दिली असेल तर आपण त्याचे पुन्हा तोंड बघत नाही. माझ्या वडिलांची हत्या झालेली असताना तुम्ही जर त्याला कौटुंबिक वाद म्हणत असाल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR