लातूर : प्रतिनिधी
आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती लातूरच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीसाठी येथील महात्मा गांधी चौकात दि. ७ डिसेबरपासून उपोषण सुरु केले होते. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांची दि. १० डिसेंबर रोजी भेट घेऊन लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत उपोषणकर्त्यांची बैठक घेण्याबाबत प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी चौथ्या दिवशी उपोषण स्थगित केले.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उपोषणकर्ते अॅड. प्रदिपसिंह गंगणे, बालाजीअप्पा पिंपळे, ताहेरभाई सौदागर, अजयसिंह राठोड, अतिश नवगीरे, धनराज जोशी यांची भेट घेतली. लातूरचा शैक्षणिक आलेख उंचावत ठेवण्यासाठी लातूरला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत असेन लवकरच आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती पदाधिकारी यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत बैठक लावणार असल्याचे मनोगत व्यक्त्त केले. उपोषणकर्ते यांना नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. यावेळी अॅड. व्यंकट बेंद्रे, प्रशांत पाटील, नवनाथ आल्टे, लाला सूरवसे आदी उपस्थित होते.