वीज प्रश्नांवर ४ खासदार, ५ आमदारांच्या उपस्थितीत बैठक

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणच्या अधिका-यांची लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील ४ खासदार व ५ आमदार उपस्थित होते. जिल्ह्यातील वीज समस्या, वाढती विजेची मागणी, अपुरा पायाभूत वीजपुरवठा, शेतीपंपांचा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर तसेच प्रलंबित तक्रारींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन वर्षांपासून वीजपुरवठ्याबाबत नागरिक व शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीज खंडित होणे, तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या तसेच शेतीपंपांना सुरळीत वीज न मिळणे, अशा विविध प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याची गरज असून महावितरणसंदभार्तील अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या निवारणासोबतच राज्य शासनाच्या महावितरणशी संबंधित योजनांवरही चर्चा करण्यात आली. काही प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बैठकीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असून स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवर, तर राज्य व केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्यात येतील. येत्या आठ-दहा दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात वीजेचा प्रश्न गंभीर का झाला आहे, याबाबत बोलताना खा. चव्हाण यांनी जिल्ह्यात विजेची मागणी वाढली असून त्या तुलनेत वीज वितरणाचे पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच बैठक घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.या बैठकीस महावितरण जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, सहअध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे, खा. नागेश पाटील आष्टीकर, खा. रवींद्र चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, आ. श्रीजयाताई चव्हाण, आ. जितेंद्र अंतापूरकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अधीक्षक अभियंता संजय खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, गोविंदराव शिंदे नागेलीकर आदी उपस्थित होते.

नागरिक, शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडवा
खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी वीजपुरवठा हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि विकासाचा मुख्य आधार असल्याचे सांगितले. महावितरणची सेवा ही जनतेची सेवा असल्याने नागरिक व शेतक-यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना अधिका-यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वीज खंडित होण्याच्या प्रश्नावर गांभीयार्ने लक्ष
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेऊन नागरिक, शेतकरी व वीजग्राहकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी बैठक झाल्याचे स्पष्ट केले. वीजपुरवठा सुरळीत व अखंडित असणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे वीज खंडित होणे, प्रलंबित तक्रारी, शेतीपंपांचा वीजपुरवठा आणि स्थानिक पातळीवरील विविध अडचणी याकडे गांभीयार्ने लक्ष देऊन वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रलंबित वीज जोडण्या, ट्रान्सफॉर्मरच्या समस्यांवर चर्चा
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघातील विविध वीजविषयक अडचणी व समस्यांवर महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. प्रलंबित वीज जोडण्या, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या, सुरळीत वीजपुरवठा तसेच नागरिकांच्या इतर तक्रारींबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आता या बैठकीनंतर जिल्ह्यातील वीज प्रश्न कितपत मार्गी लागतात आणि येत्या आठ-दहा दिवसांत होणा-या पुढील बैठकीत कोणते ठोस निर्णय घेतले जातात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Arvind Patil Nilangekar|३३.५३ कोटींचं कर्ज प्रकरण; निलंगेकरांची याचिका खंडपीठाकडून फेटाळली
02:43
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37

Latest news