19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. ओबीसींचे किमान १०० आमदार विधानसभेत निवडून यायला हवेत अन्यथा ओबीसी आरक्षण धोक्यात आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे या जरांगेंच्या मागणीला पवारांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते प्रयत्न करतील. ओबीसींचे आरक्षण ज्या तत्त्वांवर सुप्रीम कोर्टात थांबवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी इम्पिरियल डेटा नसल्याने शिक्षण, नोकरीतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती विधानसभेच्या माध्यमातून देतील असा आमचा अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.

त्याशिवाय आरक्षण वाचवायचं आहे का हे ओबीसींनी ठरवले पाहिजे. जर आरक्षण वाचवायचे असेल तर किमान १०० ओबीसी आमदार या विधानसभेत निवडून आले पाहिजेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी मराठ्यांना केंद्राकडून टक्केवारी वाढवून घ्या आणि ओबीसीतून आरक्षण मिळवा असे म्हटले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही ओबीसींची मागणी त्यांना मान्य नाही. वंचित बहुजन आघाडी ओबीसींसोबत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR