लातूर : प्रतिनिधी
शहरात दुपारी कडाक्याचे ऊन असताना मंगवारी सायंकाळी शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. मागील तीन ते चार दिवसांपासून दुपारी कडाक्याचे ऊन व सायंकाळी चारनंतर ढगाळ वातावरण तयार होत आहे. मंगळवारीही दुपारनंतर ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वा-यासह सवापाचच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या वातावरणामुळे दुपारच्या उकाड्यापासून शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. मोठ्या प्रमाणात पाऊस बरसेल असे वाटत होते. मात्र, काही वेळातच आकाश पुन्हा निरभ्र झाले.
शहर आणि परिसरात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत कडक ऊन लागत असताना अचानक सवापाचच्या सुमारास पाऊसाच्या सरी कोसळालायला लागल्या. पुढील दोन दिवसांतही पावसाच्या किरकोळ सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत हलक्या व तध्यम सोरूपाचा पाऊस पडत होता. पुढील दोन ते चार दिवसांतही शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.