37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूर‘शिरखुर्मा’चा सुका मेवा महागला 

‘शिरखुर्मा’चा सुका मेवा महागला 

लातूर : प्रतिनिधी
मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु झाल्यापासून सुकामेव्याच्या किंमतीत साधरणत: १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी रमजान ईद साजर केली जाणार आहे. ईदच्या दिवशी खास असलेला ‘शिरखुर्मा’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुकामेव्याला प्रचंड मागणी वाढली आहे. महागाई असली तरी सुकामेवा आवश्यक असल्याने खरेदी केला जात आहे. तसेच इतरही साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
रमजान पर्वात मुस्लिम बांधवांचे काही खास पदार्थ तयार होत असतात. ते पदार्थ फक्त रमजान पर्वातच उपलब्ध होतात. रमजान महिन्यात इफ्तारसाठी या पदार्थांची मेजवानी असते. त्यामुळे मिठाई, सुकामेवा तसेच खमंग पदार्थांची अनेक दुकाने शहरात थाटली आहेत. शिरखुर्मा, सुतरफेणी, मालपोवा, शाही तुकडा, तुर्री आणि कबाब या पदार्थांना रमजान महिन्यात जास्त मागणी आहे. जवळपास या सर्वच पदार्थांमध्ये शेवया वापरल्या जातात. परंतु त्यांच्या चवीमध्ये मात्र फरक आहे. शहरातील बाजारात सुकामेव्याची मोठी रेलचल चालू असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे. शहरातील विविध भागात सुकामेवाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर मुसलीम बाधंवाकडुन सुकामेवा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.   बाजारात रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर विविध प्रकारचा सुकामेवा दाखल झाला असून मुसलीम बाधंवाकडुन त्याची खरेदी मोठी खरेदी चालू आहे.
शहरातील बाजारात काजू ७०० रूपये किलो,  बदाम ६८० रूपये किलो, किसमिस २२० रूपये किलो, ग्रीन पिस्ता १९०० रूपये किलो, आक्रोड मगज ११५० रूपये किलो, खारीक ४३० रूपये किलो, न. पिस्ता ११०० रूपये किलो, अंजीर ८८० रूपये किलो, चारोळी २६०० रूपये किलो, टरबुज मगज ८०० रूपये किलो, खरबुज मगज १२०० रूपये किलो, विलाईची २६०० रूपये किलो, केसर १ ग्रॅम २३० रूपये, घी ७०० रूपये किलो, मिल्कमेड ४०० ग्रॅम १४० रूपये, शेवई ९० रूपये किलो, गोळा खोबर १६० रूपये किलो, खसखस १७०० रूपये किलो, गुळ ६० रूपये किलो, कलर १० रूपये, रोझ १७० रूपये, पापड ५०० ग्रॅम १२० रूपये, अचार ५०० ग्रॅम ९५ रूपये, फरसन २४० रूपये किलो, दसेंस ५० रूपये, आंवला मुरब्बा २४० रूपये किलो, मुखवास २६० रूपये किलो, जवस १२० रूपये किलो, शाही टी मसाला ९०० रूपये किलो, गुलकंद १८० रूपये किलो, काजु बदाम पाक ७२० रूपये किलो, मसाला काजु ९५० रूपये किलो, बदाम नमकीन १००० रूपये किलो, मखाने १२०० रूपये किलो, मेवा मिक्स ५५० रूपये किलो, धने १६० रूपये किलो, जीरा ४२० रूपये किलो, शाहजीरा ७२० रूपये किलो, ववा ४८० रूपये किलो, लवंग ११०० रूपये किलो, दालचिनी ३८० रूपये किलो, दगडफुल ६०० रूपये किलो, तेजपाल १२० रूपये किलो, मिरची मसाला ५०० ग्रॅम ४७० रूपये, किवी ४८० रूपये किलो, पायनापल ७६० रूपये किलो, ब्लॅक पल्म ८०० रूपये किलो, क्रॅनबेरी ९०० रूपये किलो,  ब्लुबेरी ५०० ग्रॅम ८८० रूपये या दराने बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR