31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeलातूरशिव छत्रपती शिक्षण संस्थेचे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला १५६ विद्यार्थी पात्र

शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला १५६ विद्यार्थी पात्र

लातूर : प्रतिनिधी
नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स-२०२४ परीक्षेचा निकाल दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर झाला. या परिक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले असून या संस्थेचे १५६ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला पात्र ठरले आहेत.
शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत येणा-या राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेतील पीसीएम ग्रुपच्या २७३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण घेणारे ११ विद्यार्थी. देशात खुल्या संवर्गातील ९३.२३६२१८१  पेक्षा अधिक पर्सेटाईल घेणारे विद्यार्थी जेईई-अडव्हान्स परीक्षेसाठी पात्र आहेत. महाविद्यालयातून ९३.२३६२१८१ पेक्षा अधिक पर्सेंटाईल घेणारे ८७ विद्यार्थी आहेत.
या परीक्षेमध्ये आर्यन भारत सुर्यवंशी विद्यार्थी ९९.९५०५०९८ पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आलेला आहे. वेदांत गणेश हलकुडे ९९.८८१३९४३ द्वितीय आला आहे. सोहम लक्ष्मीकांत लाभशेटवार ९९.८६७३१६८ तृतीय, संस्कृती सुनिलकुमार कुलकर्णी ९९.८५७५०२५ मुलीत महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तनिष्क राजीव भुजबळे ९९.७३०३६ अनुसूचित जाती संवर्गातून प्रथम, श्रीधर बस्वराज कोळी ९५.८४०१९०० अनुसूचित जमाती या संवर्गातून प्रथम आहे. दिव्यांग संवर्गातून हर्षवर्धन उमेश मसलगे ९४.०९५३२०२ प्रथम आला आहे. या निकालावरुन असे दिसून येते की, संस्थेच्या ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नामंकित अशा एनआयटी, आयसर, आयआयआयटी या कॉलेजमध्ये निश्चित प्रवेश मिळू शकतो.
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष  डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, एसटीएनएमएसचे संचालक बी. ए. मैदर्गी, समन्वयक प्रा. जयराज गंगणे व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR