39.1 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeलातूरकेजीएन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे आपत्य प्राप्तीत मोलाचे कार्य 

केजीएन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे आपत्य प्राप्तीत मोलाचे कार्य 

लातूर : प्रतिनिधी
ईश्वराने प्रत्येक दाम्पत्याला कमीत कमी एक सुृढ बाळ दिले पाहिजे व त्याला कुठल्याही प्रकारचा व्यंग नसलेले बाळ असणे फार महत्त्वाचे आहे. या कामी डॉ. आमिर शेख त्यांच्या केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलद्वारे वंध्य दांपत्याना आपत्यप्राप्ती करुन देण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत, असे गौरोद्गार पी. सी. एस. प्रमुख डॉ. गिरीष मैंदरकर यांनी काढले
येथील के. जी. एन. टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलतर्फे गेल्या २५ वर्षांपासून ईद मिलन सोहळा साजरा केला  जातो. यंदाही दि. २४ एप्रिल  रोजी हॉटेल कार्निवल रिसॉर्ट येथे ईद मिलन कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी डॉ. मैंदरकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. नवाब जमादार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, मधुमेह विकार तज्ज्ञ डॉ. चांद पटेल, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. विवेक याडकीकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. मैंदरकर यांनी डॉ. अमीर शेख यांच्या टेस्ट ट्युब बेबीचे तंत्रज्ञान व त्यांच्या उच्च यशस्वीतितेचे प्रमाण याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना डॉ. आमिर शेख यांनी आपण डॉक्टर कसे झालो, ग्रामीण भागात सरकारी नोकरी करताना अनुभवलेल्या गरीब रुग्णाच्या व्यथा व अडचणी व डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून शासना स्तरावर सुचविलेले बदल याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरुपात विलास कांबळे यांच्यासह रुग्णांनी आपले मनोगत व एका रुग्णांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वादिष्ट जेवण व शीरखुर्माच्या आस्वाद घेतल्यानंतर फिरदौस शेख यांनी सर्वांच आभार मानल.े

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR