39.1 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeलातूरजिल्ह्यातील सात पोलीस कर्मचा-यांना पोलीस सन्मानचिन्ह

जिल्ह्यातील सात पोलीस कर्मचा-यांना पोलीस सन्मानचिन्ह

लातूर : प्रतिनिधी
पोलीस दलात सेवा कालावधीत प्रशंसनीय काम आणि सेवा सातत्य याची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यातील ८०० कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना महासंचालकाचे ‘सन्मानचिन्ह’ जाहीर केले असून यात लातूर पोलीस दलात कार्यरत सात कर्मचा-यांचा समावेश आहे.
सेवा कार्यकाळात प्रशंसनिय कार्य आणि सेवा सातत्य लक्षात घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व मोठ्या प्रमाणात पोलीस हवालदार, शिपाई यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह-२०२३ जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रदिनी १ मे रोजी त्या-त्या जिल्ह्याचे ठिकाणी सन्मान चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. पत्र, सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब नागोराव मस्के, संजय रामराव भोसले, शिवाजी रामचंद्र जाधव, माधव दत्तात्रय केंद्रे यांचा पोलीस हवालदार अरूण रूकमाजी डोंगरे, परमेश्वर बाबुराव अभंगे, शिवाजी निवृत्ती गुरव या पोलीस कर्मचा-यांचा पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह बहाल करण्यात आलेल्यात समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील ‘सन्मानचिन्ह’ घोषीत झालेल्या कर्मचा-यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र अभिनंदन करित आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR