24.5 C
Latur
Thursday, June 26, 2025
Homeलातूरशेळगाव, नळेगाव येथे ५० कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ 

शेळगाव, नळेगाव येथे ५० कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ 

चाकूर : प्रतिनिधी
केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत शेळगाव आणि नळेगाव येथे ५० कोटी रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ झाला असून हा रस्ता दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावे असे निर्देश सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांच्या हाळी ते डोंगरज १० किलोमीटर आणि घरणी ते नळेगाव-हुडगेवाडी या १० किलोमीटर रस्त्याचा २५ कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यांत आले.
              या प्रसंगी सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, हा रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांचा परस्परांशी आणि मुख्य बाजारपेठांशी होणारा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तसेच, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विकासाच्या कक्षा अधिक रुंदावत असताना रस्ते महामार्ग उत्तम दर्जाचे व्हावेत. त्याचबरोबरीने मतदारसंघाचाही विकास व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले की, मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी देणार असून मतदार संघातील रस्त्यांमुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहकाराशी जोडणार असून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे काम सहकार खात्याच्या माध्यमातून करायचे आहे असे प्रतिपादनही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेळगाव व नळेगाव येथे आयोजित कार्यक्रमात शेवटी केले.
शेळगाव फाटा येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे हे होते तर नळेगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सूर्यकांत चव्हाण होते. या भुमीपूजन प्रसंगी प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, युवा नेते सुरज पाटील, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, नगराध्यक्ष करीमसाब गुळवे, बालाजी सूर्यवंशी, मिलिंद महालिंगे, गंगाधर अक्कानरू, उत्तमराव पाटील, निर्मलाताई वाडकर, यशवंत जाधव, सुदर्शन मुंढे, राहुल सुरवसे, भानुदास पोटे, मुजम्मिल सय्यद, इलियास सय्यद, मुर्तुजा सय्यद,राम कसबे,गणपत नितळे,सुभाष चापोले, विष्णू तिकटे, अनिल वाडकर, विश्वनाथ ऐडके, शिवशंकर हाळे, समाधान डोंगरे, राजाराम महात्मे, बळीराम भोसले, गणपत मुंढे, संदीप शेटे, मधुकर कांबळे, सचिन तोरे, संगमेश्वर वाडकर, प्रफुल्ल चवळे, सिद्धेश्वर अंकलकोटे, मधुकर मुंडे, शेषेराव मुंजाने, पदमीनबाई खांडेकर, सावता माळी, खुदबुद्दीन घोरवाडे, सूर्यकांत सावंत, मार्शल माने, व्यंकटराव पाटील,सुरेंद्र सावंत, सर्फराज घोरवाडे, गणेश शिंदाळकर, उमाकांत सावंत, जनाबाई सुरवसे, नागनाथ भालेकर, सतीश पांडे, धोंडीराम रामपुरे, रामकृष्ण शिरूरे, चंद्रकांत शेलार यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित  होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.अलका डाके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी यांनी केले. आभार प्रदर्शन बिलाल पठाण यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR