24.5 C
Latur
Thursday, June 26, 2025
Homeलातूरश्रीमती सुशिलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. मोहाळे यांचा सत्कार

श्रीमती सुशिलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. मोहाळे यांचा सत्कार

लातूर : प्रतिनिधी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर संचलित श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी मोहाळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून पीएच. डी. ही पदवी प्रदान केली. त्यांच्या या कार्याबद्दल मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी प्रा.डॉ. शिवाजी मोहाळे यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच यथोचित असा सत्कार महाविद्यालयात करण्यात आला.
प्रा. डॉ. शिवाजी मोहाळे यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय समाजाचा अभ्यास (विशेष संदर्भ लातूर जिल्हा) या विषयावरील शोध प्रबंधाचे लेखन केले. त्यांचे मार्गदर्शक हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास आघव हे होते. प्रारंभी प्रास्ताविक विचार  प्रा. डॉ. कुमार बनसोडे यांनी  मांडले.  तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी आपले महाविद्यालय हे लवकर १०० टक्के डॉक्टरेट असलेले महाविद्यालय असेल, असा विश्वास  या प्रसंगी व्यक्त केला व  प्रा.  डॉ. शिवाजी मोहाळे यांचे कौतुक  व अभिनंदन केले. शेवटी सर्वांचे आभार प्रा.डॉ. माधव पलमंटे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR