लातूर : प्रतिनिधी
भाजपने षडयंत्र रचून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शेती मालाला भाव नाही, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे, महागाई वाढलेली आहे, हे सांगताना त्यांनी हे जनतेच्या मनातील सरकार नाही. हे लादलेले सरकार आहे, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली, अशा शब्दांत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. काँग्रेसच्या विचारांची माणसे, आपल्या विचारांची माणसे सरकारमध्ये असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
औसा तालुक्यातील सत्तरधरवाडी, सोनपट्टी तांडा, कुलकर्णी तांडा, लखनगाव, उटी बु. या गावांच्या गावभेटीदरम्यान आमदार धिरज देशमुख बोलत होते. याप्रसंगी संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शामराव भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुप शेळके, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारकाखान्यांचे तज्ज्ञ संचालक महिंद्र भादेकर, बाबुराव जाधव, जागृती कारखान्याचे संचालक बालाजी पाटील, संजय चव्हाण आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात महाविकास आघाडीने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली. ते म्हणाले, कोविड काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने गाव तांड्यापर्यंत ऑक्सिजन, औषध पुरवठा, निवास, भोजनाची व्यवस्था केली. आमदार अमित देशमुख लातूरचे पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून बरीच कामे या ठिकाणी केली. काँग्रेसच्या विचारांची माणसे, आपल्या विचारांची माणसे सरकारमध्ये असणे गरजेचे आहे.
आपण सर्वांनी मिळून मला २०१९ ला मतदानरुपी आशीर्वाद दिला व एक आमदार म्हणून माझी ओळख निर्माण झाली. विधिमंडळामध्ये आपले प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपने षडयंत्र रचून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आज शेती मालाला भाव नाही, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे, महागाई वाढलेली आहे, हे सांगताना त्यांनी हे जनतेच्या मनातील सरकार नाही. हे लादलेले सरकार आहे. महाराष्ट्रात लोककल्याणकारी सरकार हे महाविकास आघाडीचे होते. महायुतीचे हे सरकार भ्रष्टाचारी व लबाड सरकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.