नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये ऑडी कारचा झालेला अपघात सध्या गाजत आहे. या कारची नोंदणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात झाला तेव्हाच संकेत हाही कारमध्येच होता, असेही समोर आले आहे.त्यानंतर सुषमा अंधारे आज सकाळी थेट नागपूरमधील सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. आणि त्यांनी संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही? असे पोलिसांना एकामागोमाग एक सवाल विचारत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
याच मुद्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे आणि सरकारलाही घेरले असून संजय राऊत तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी काही व्हीडीओ,तर काही फोटोंच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरले आहे. बावनकुळेंचा मुलगा असल्याने त्याला वाचवायचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
त्यानंतर सुषमा अंधारे आज सकाळी थेट नागपूरमधील सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. आणि त्यांनी पोलिसांना एकामागोमाग एक सवाल विचारत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अपघातग्रस्त गाडीचा नंबर एफआयआरमध्ये का नाही? अपघात झाल्यावर गाडी पोलिस स्टेशनला आणण्याऐवजी ती गॅरेजमध्ये (दुरुस्तीला) का पाठवण्यात आली? हा अपघात झाल्यावर त्या गाडीतील दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, पण संकेत बावनकुळे याची मेडिकल का केली नाही? असे एकामागोमाग एक सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली.