23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरसंजय क्षीरसागर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

संजय क्षीरसागर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मलीकपेठ / प्रतिनिधी

मोहोळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आपल्यासोबत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्धल अभिनंदन करण्यासाठी मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर यांनी खा. शरद पवार यांची पुणे येथील मोतीबाग येथील कार्यालयात भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सतीश पाटील हे उपस्थित होते.

या भेटीमध्ये संजय क्षीरसागर यांनी खा. पवार यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार खा. प्रणिती शिंदे यांना गावनिहाय मिळालेल्या मताधिक्याबाबत सविस्तर माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR