24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeसोलापूरसकल ओबीसी समाजातर्फे संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

सकल ओबीसी समाजातर्फे संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

पंढरपूर : शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांचे बाबतीत अत्यंत हिनदर्जाची भाषा वापरून शिवीगाळ केलेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाज आक्रमक झाला असून संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले व यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरणं मुश्किल करू व पंढरपूरात आल्यास त्याचे तोडं काळे करु असा इशाराही बांधवांच्या वतीने बोलताना माऊली हळणवर यानी दिला यावेळी उत्तम चव्हाण ,रामभाऊ माळी ,सत्तजित मोहळकर ,बाळासाहेब होरणे ,शिवाजी मस्के ,पिटु माळी, वैभव गाडेकर, मेडशिंगेकर सर ,आमोल डोके गाडेकर मेंबर ,सोमनाथ ढोणे ,दादा कोळेकर,अनील अभंगवार यांचे सह ओबिसी बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR