21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeराष्ट्रीयहवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न!

हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न!

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची कॉम्प्युटर सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न झाला. मालवेअर अ‍ॅटॅक करून हवाई दलाचा डेटा चोरण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, वेळीच ही बाब लक्षात आल्याने हवाई दलाचा महत्वाचा डेटा वाचला आहे. हे हॅकर्स कोण होते हे अद्याप समजू शकलेले नाहीय.

गुगलच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या आधारे ओपन सोर्स मालवेअरद्वारे हा हल्ला करण्यात आला होता. सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने १७ जानेवारी २०२४ ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता. हा मालवेअर ‘गिट हब’ वर सहजरित्या उपलब्ध होत होता. याच मालवेअरच्या मदतीने भारताची संरक्षण यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न झाला.

तथापि, हवाई दलाचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही. मालवेअरचा हल्ला फोल ठरला. हवाई दलाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि फायरवॉल यंत्रणा आहे, ज्यामुळे डेटा चोरीला आळा बसल्याचे या प्रकरणाशी संबंधीत अधिका-यांनी म्हटले आहे.

हॅकर्सनी गेल्या वर्षी सप्टेंबरमधील १२ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हवाई दलाच्या आदेशाचा वापर करून रिमोट-नियंत्रित ट्रोजन हल्ल्याची योजना आखली होती. यासाठी त्यांनी र४-30_अ्र१ू१ां३ ढ१ङ्मू४१ीेील्ल३ नावाची ेकढ फाइल तयार केली होती. ती फाईल हवाई दलाच्या संगणकांवर पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR