19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंनी दाखविली टिंगरेंची नोटीस

सुप्रिया सुळेंनी दाखविली टिंगरेंची नोटीस

पुणे : प्रतिनिधी
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, सुनील टिंगरे यांनी सांगितले की मी कोणतीही नोटीस पाठवली नाही. यामुळे या नोटीसची कॉपी मी आणली आहे. यामध्ये शरदचंद्र पवार यांचे नाव आहे. त्यांच्या नावानीशी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. त्यात पोर्शे कार अपघात प्रकरणात बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पुणे येथील आमदार सुनील टिंगरे काही म्हणण्यापूर्वी पोर्शे प्रकरणामुळे चर्चेत आले होते. आता त्यांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रचारसभेत दिली होती.
त्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी याचा नकार दिला होता. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस दाखवली.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आता आम्ही कशासाठी माफी मागावी. आमदार टिंगरे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिस स्टेशनला गेले होते, हे पोलिसांनी मान्य केले आहे. माध्यमांमध्ये त्या बातम्या आल्या आहेत. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले तर आमच्यावर ते फौजदारी आणि गुन्हेगारी खटला दाखल करणार आहेत. आम्हाला हा गुन्हा मान्य आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ही नोटीस दिली आहे. ही नोटीस १५ ऑक्टोबर रोजी पाठवली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR