सेनगाव : प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा मोठ्या प्रमाणात केल्या जात असून तो प्रशासनाने तात्काळ बंद करावा या मागणीसाठी चिखलाकर येथील तरुण सचिन मस्के यांनी गावातील जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, सेनगाव तालुक्यात पूर्णा नदी पत्रातून रात्रंदिवस रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा केल्या जात आहे या अवैध रेती उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत निघत आहे. रेती माफियांकडून घातपाताची व आरेरावी भाषेचा वापर करून आपल्या मुजोरीची कायम दहशत ठेवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या पूर्णा नदीच्या रेती घाटावरून २० ते ४० अवैध टिप्परद्वारे रेतीचा उपसा करण्याचा धडाका कायम असून याकडे महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कायम होत असल्याचा आरोप केला जात आहे. सदर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर रात्रंदिवस भरधाव वेगाने चालत असून यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
अवैध रेती वाहतुकीमध्ये विना नंबरच्या टिप्पर चा वापर सर्रास केल्या जात असल्याने या टिप्पर चालकाचा व रेतीमाफीचा मुख्य अक्का कोण हे शोधणे मात्र आता कठीण होऊन बसले आहे. अवैध रेती उपसा व वाहतुकीला कुणाच्या मुक संमतीने चालू आहे हे शोधणे आता काळाची गरज आहे.
महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन या अवैध रेती उपशावर लगाम लावणार का हे मात्र येणारा काळच सांगणार आहे. तालुक्यात त वाढलेली रेती माफियाची मजुरी पोलिस प्रशासनाकडून मोडीत निघणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
सेनगाव तालुक्यातील होत असलेली अवैध उपसा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तालुक्यातील चिखलाकर येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी यासह तहसीलदार सेनगाव पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या मागणीची प्रशासनाकडून योग्य ती पूर्तता न झाल्याने अखेर चिखलाकर येथील असंख्य ग्रामस्थ व गजानन राठोड यांच्यासह तरुण सचिन मस्के यांनी प्रशासनाच्या विरोधात व तालुक्यात होत असलेला अवैध रेती उपसा तात्काळ बंद करावा या मागणीसाठी त्यांनी गावातील जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन केल्याने तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली असल्याचे पहावयास मिळाले. यावेळी नायब तहसीलदार सरोदे, तलाठी इंगोले, पोलिस उपनिरीक्षक स्वामी बीट जमादार पवन चाटसे यास अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होते.