22.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडास्मृती मानधनाचा ऐतिहासिक शतक

स्मृती मानधनाचा ऐतिहासिक शतक

वनडेमध्ये पहिली महिला फलंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय महिला संघ वि. न्यूझिलंड महिला संघामध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ च्या फरकाने विजय मिळवला. टी-२० विश्वचषक २०२४ मधील पहिल्याच सामन्यात न्यूझिलंडने भारताच्या केलेल्या पराभवाचा टीम इंडियाने या मालिकेतून बदला घेतला आहे. स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक या सामन्याचा महत्त्वाचा भाग ठरले. स्मृती मानधनाच्या शतकाच्या जोरावर भारताने न्यूझिलंडवर तिस-या सामन्यात ६ विकेट्सनी विजय मिळवला. या शतकासह स्मृती मानधनाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

तिस-या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझिलंड संघाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. किवी संघ ४९.५ षटकांत २३२ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ तर प्रिया मिश्राने २ विकेट घेतल्या. न्यूझिलंड संघाने दिलेल्या २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवत फार चांगली झाली नाही. सलामीवीर शफाली वर्मा १६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सलामीवीर स्मृती मानधना हिने यस्तिका भाटियाबरोबर चांगली भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० च्या जवळ नेली.

यास्तिका भाटिया बाद झाल्यानंतर मानधनाला कर्णधार हरमनप्रीत कौरची चांगली साथ लाभली. यादरम्यान मानधनाने वनडेमध्ये शतक झळकावले. हे तिचे वनडे कारकीर्दीतील ८वे शतक होते. स्मृतीने १२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. अशाप्रकारे महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिने मिताली राजचा ७ वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR