लातूर : प्रतिनिधी
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा शनिवारी दि.६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जवळपास २५ ते ३० हजार पेक्षा जास्त भाविक भक्त्त उपस्थित होते. यावेळी १२५० भाविकांनी उपासक दिक्षा घेतली. सकाळी ९.३० ते ११.३० शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रथामधे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिध्द पादुका व प्रतीमेच्या समोर कलश धारी महीला, भगवा धारी लेझीम पथक, विविध फलक, ध्वजधारी पुरुष, महिला व भजनी मंडळ सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी १२ ते १.३० वाजता गुरु पुजन व महाआरती करण्यात आली. १.३० ते ३ नाणीज पिठाच्या ज.न.म. प्रवचनकार अंजलीताई निकम यांचे अमृततुल्य असे प्रवचन झाले.
या प्रवचनात आध्यात्म, भक्ती, विज्ञान यावर प्रवचन झाले. यावेळी १२५० भाविकांनी उपासक दिक्षा घेतली, दुपारी ३ ते ६.३० जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला तसेच सायंकाळी ६.३० वाजता जगद्गुरु श्रींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करुन सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व भाविकांसाठी पिण्याचे थंड पाणी व महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, संजय निलेगावकर, देविदास काळे, सुनील मलवाड, डॉ. शिवाजी काळगे व कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्यास स्व-स्वरुप संप्रदाय सेवा समिती पदाधिकारी व सर्व भक्त्तगणांनी परिश्रम घेतले.