१२ कोटी भाविकांच्या स्वागताची तयारी , सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असून, त्यांच्या सोयीसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांपैकी तब्बल ८५ टक्के कामे कायमस्वरूपी, तर केवळ १५ टक्के कामे कुंभमेळ्यापुरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणा-या पायाभूत सुविधा पुढील अनेक वर्षे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नागरिकांना सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकाचवेळी हाती घेण्यात आलेल्या या विविध कामांमुळे खड्डेमय रस्ते, नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील खोदकामे, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर आदी विविध कारणांवरून सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतआहे. या पार्श्वभूमीवर, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या कामांमुळे नागरिकांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याचे मान्य करीत ही कामे कुंभमेळ्यापुरतीच मर्यादित न राहता ती नाशिक जिल्ह्याच्या पुढील दीड ते दोन दशकांच्या विकासाचा पाया ठरणार असल्याचे नमूद केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत २२ हजार ४२५ कोटी ३९ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास, महापारेषण आणि जिल्हा परिषद यांच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातूनही ८ हजार ७६१ कोटी ५४ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, महापालिका आणि एमएसआयडीसीच्या माध्यमातून रस्ते, वाहतूक, रेल्वे, पाणी, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प राबवले जात आहेत.

कुंभमेळ्यानंतरही सुविधांचा फायदाच होणार
धार्मिक परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांचा समन्वय साधून नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. कुंभमेळ्यानंतरही या सुविधा नागरिक आणि पर्यटकांसाठी उपयोगी ठरतील, असा दावा कुंभमेळा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27

Latest news