२७० वाढीव खासदारांवरील खर्च कोट्यवधींच्या घरात!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने लोकसभेतील खासदारांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. सीमांकन विधेयकाशी निगडित नव्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानुसार राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. याचसाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा नाही. आता खासदारांची संख्या वाढणे म्हणजे त्यांचे वेतन, भत्ते, सरकारी निवासस्थान, दौरे, इतर सुविधा, त्याचा खर्च वाढणार आहे. तसेच संसद खर्चही वाढणार आहे. वाढीव खासदारांचा वार्षिक खर्च काढल्यास १०० कोटींपेक्षाही जास्त जाऊ शकतो. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वाढीव भार पडणार आहे.

लोकसभेत विद्यमान खासदारांची संख्या ५४३ वरून आता ८१५ इतकी होणार आहे. म्हणजे सीमांकन विधेयक मंजूर झाल्यास देशात २७० खासदार वाढणार आहे. आता या २७० खासदारांवरील खर्चाचा हिशेब अंदाजे कोट्यवधींच्या घरात जातो. खासदारांना केवळ दर महिन्याचेच वेतन नव्हे तर याशिवाय त्यांना कामकाज, कार्यालयीन खर्चासाठी वेगवेगळे भत्ते दिले जातात. त्यामुळे वाढीव खासदारांचे वेतन, भत्ते यासह मोठा खर्च वाढणार आहे. या खर्चाचा बोजा सामान्य जनतेवर पडणार आहे.

केंद्र सरकारने १ एप्रिल २०२३ पासून लागू असलेल्या दरानुसार प्रत्येक खासदाराला महिन्याला १ लाख २४ हजार रुपये वेतन मिळते. त्याशिवाय मतदारसंघातील भत्ता ८७ हजार रुपये, ७५ हजार कार्यालयीन खर्च असे एकूण खासदारांना दरमहा २ लाख ८६ हजार रुपये मिळतात. आता नव्या २७० खासदारांचा हिशेब लावला तर महिन्याकाठी केवळ वेतनापोटी ७.७२ कोटी रुपये मोजावे लागतील. संपूर्ण वर्षभराचा विचार केल्या ९२.६६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च केवळ वेतन आणि भत्यांचा आहे. हे केवळ खासदारांच्या संख्येवरच थांबणार नाही तर भविष्यात आमदारांची संख्याही वाढणार आहे.

अधिवेशन काळातील
भत्ताच खर्च ४ कोटींवर
खासदारांना संसद अधिवेशन काळात दैनिक भत्ता दिला जातो. हा भत्ता दररोज २५०० रुपये असतो. हा भत्ता देण्यासाठी नियम व उपस्थितीच्या अटी लागू आहेत. जर २७० नव्या खासदाराला वर्षातून ६० दिवस दैनिक भत्ता दिला तर ही रक्कम ४.०५ कोटींवर जाते.

निवासाची व्यवस्था
करणे आवश्यक
खासदारांना दिल्लीत राहण्यासाठी सरकारी निवासस्थान मिळते. आता खासदार वाढले तर त्यांच्या राहण्याची जागा, फर्निचर, दुरुस्ती, वीज, पाणी, टेलिफोन आणि इतर सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील. नव्या खासदारांसाठी २७० फ्लॅट किंवा निवासस्थानांची व्यवस्था करावी लागेल.

फंडही वाढणार
खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला जातो. सध्या ही रक्कम वार्षिक ५ कोटी इतकी आहे. जर ही योजना अशीच सुरू राहिली तर अतिरिक्त २७० खासदारांसाठी वर्षाला १३५० कोटी विकासनिधी द्यावा लागेल. ही रक्कम मतदारसंघातील विकास कामांवर खर्च करावी लागेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news