मुंबई : प्रतिनिधी
पवई येथे एका तीन वर्षांच्या अल्ववयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्यासह वयोवृद्ध आजोबांनी लैंगिक चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यासह वयोवृद्ध आजोबाविरुद्ध पवई पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिला आपल्या पतीसोबत न रहाता विभक्त रहात होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ती तिच्या मुलीला तिच्या वडिलांकडे घेऊन जात होती. मुंबईत तिचे वडिल आणि आजोबा पवईतील एका फ्लॅटमध्ये तिच्यासोबत वेळ घालवत होते. डिसेंबर २०२५ पासून तिच्या वडिलांनी तिच्याशी अश्लील चाळे, तर तिच्या वयोवृद्ध आजोबांनी लैंगिक अत्याचार केला होता. अलीकडेच हा प्रकार तक्रारदार महिलेच्या लक्षात आला होता.
या प्रकारानंतर तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पतीसह सास-याविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
















