28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeलातूर७,४२,६८७ मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाट

७,४२,६८७ मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाट

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ४२ मतदारांपैकी १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे जिल्ह्यात ६२.५९ टक्के मतदान झाले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी मोठ्या प्रमणात जनजागृती करुनही लातूर लोकसभा मतदारसंघातील ७ लाख ४२ हजार ६८७ मतदारांनी मतदानाकडे पाट फिरवली.
लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणा-या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ३ लाख २४ हजार ३०३ मतदारांपैकी २ लाख ११ हजार ७११ मतदारांनी म्हणजेच ६५.२८ टक्के मतदारांनी मतदान केले. लातूर शहर विधानसभा क्षेत्रातील ३ लाख ८४ हजार ९८० मतदारांपैकी ६०.७७ टक्के म्हणजेच २ लाख ३३ हजार ९३४ मतदारांनी आपला हक्क बजाविला. अहमदपूर विधानसभा क्षेत्रात ३ लाख ३८ हजार ६१४ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ७२६ मतदारांनी (६२.१२ टक्के), उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ३ लाख १२ हजार ८६५ पैकी १ लाख ९८ हजार ६२ मतदारांनी (६३.३१ टक्के), निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील ३ लाख २२ हजार ७२८ मतदारांपैकी २ लाख १४६ मतदारांनी (६२.०२ टक्के) आणि लोहा विधानसभा क्षेत्रातील २ लाख ९३ हजार ५५२ मतदारांपैकी १ लाख ७९ हजार ७७६ म्हणजेच ६१.२४ टक्के मतदारांनी मतदान केले.
मतदारसंघातील एकूण १० लाख ३५ हजार ३७६ पुरुष मतदारांपैकी ६ लाख ६४ हजार ६३० पुरुष मतदार (६४.१९ टक्के), ९ लाख १ हजार ६०५ महिला मतदारांपैकी ५ लाख ७२ हजार ७०० महिला मतदारांनी (६०.८२ टक्के) आणि ६१ तृतीयपंथी मतदारांपैकी २५ मतदारांनी (४०.९८ टक्के) आपला हक्क बजाविला. तर  ७ लाख ४२ हजार ६८७ मतदारांनी मतदानाकडे पाट फिरवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR