40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरआग प्रतिबंधक उपायोजना; फायर ऑडिट बंधनकारक

आग प्रतिबंधक उपायोजना; फायर ऑडिट बंधनकारक

लातूर : प्रतिनिधी
शासकीय, निमशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल, दवाखाने, प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, शाळा, महाविद्यालये, अभ्सासिका, हॉटेल्स व रेस्टॉरंट, सांस्कृतिक सभागृह, औद्योगिक वसाहत, मंगल कार्यालये, कोल्ड स्टोरेज आदी ठिकाणी एक महिन्याच्या आत परिपुर्ण आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात आणि कागदपत्रांच्या पुर्ततेसह योग्यता प्रमाणपत्र घेण्यात यावे, त्यासाठी आठ दिवसांच्या आत फायर ऑडिट करण्यात यावे, असे निर्देश लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.
आगीच्या घटनांना प्रतिबंध करता यावा, यासाठी इमारतीमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण १७ नूसार आग प्रतिबंधक उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. कायद्याची अंमलबजावणी कायदा पारित झाल्याच्या दिनांकापासून करण्यात आली आहे. त्यानूसार लातूर शहरातील भोगवाटाधारकांना निवासी इमारत व व्यापारी संकुल, निमशासकीय कार्यालये, शासकीय कार्यालये, रेस्टॉरंट, गोडाऊन, औद्योगिक वसाहत, सांस्कृतिक सभागृहांमध्ये करणे आवश्यक आहे.
त्यामुळे व्यवसायिकांनी तात्काळ फायर ऑडिट तात्काळ फायर ऑडिट करुन घ्यावे. त्यानंतर एक महिन्याच्या आत परिपूर्ण आग प्रतिबंधक उपाययोजना करुन आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह शुल्क भरुन योग्येतेच प्रमाणपत्र हस्तगत करुन घ्यावे. ज्यांच्याकडे योग्यता प्रमाणपत्र नाही त्यांच्यावर नियमानूसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा कार्यालयातून सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR