40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांचे मानले आभार

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांचे मानले आभार

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. ९ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या विजयासाठी मेहनत घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर ग्रामीण, अहमदपूर, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ व जळकोट, रेणापूर, आदी तालुकानिहाय मतदानाचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आढावा घेऊन उत्कृष्ट काम केलेल्या काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांचे कौतुक केले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे  निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर  विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे  निरीक्षक अनुप शेळके, काँग्रेसचे निलंगा शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक संतोष देशमुख, काँग्रेसचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक विजय देशमुख, काँग्रेसचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवींद्र काळे, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार, कंधार शहर काँग्रेसचे अध्यक्ष हमीद सुलेमान, जळकोटचे उपनगराध्यक्ष मनमथआप्पा किडे, जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील,
 अहमदपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास महाजन, श्रीकांत बनसोडे, शहाजी साखरे, सिराजुद्दीन जहागीरदार, रामराव बुद्रे, ज्योतीताई पवार, चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, कलीमुद्दीन अहमद, फुलचंद चाटे, धनंजय चाटे, प्रा. प्रवीण कांबळे, आशिष पाटील, महेश धुळशेट्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळकोट तालुका काँग्रेसचे नेमीचंद पाटील, मुक्त्तेश्वर येणरे पाटील, संतोष तिडके, इम्रान सय्यद,  एकनाथ पाटील, विजयकुमार  साबदे, पुनीत पाटील, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी,  एन. आर. पाटील, आनंद पवार,  चंद्रकांत मद्दे, मदन भिसे, पांडूरंग वीर पाटील, प्रदीप राठोड, छाया चव्हाण, सीताबाई राठोड, जनाबाई राठोड, भानाभाई राठोड, सुनीता राठोड, कैलास पाटील, दत्ता सोमवंशी, सुपर्ण जगताप, सचिन बंडापाले, गोंिवद बोराडे, श्रीकृष्ण काळे, सचिन मस्के, महेश काळे, विजय टाकेकर, किरण बनसोडे, शिवाजी कांबळे, विलास भिसे, तात्यासाहेब पालकर, दत्तासाहेब भिसे, देविदास बोरुळे पाटील, कलीम शेख,  विकास कांबळे, सुंदर पाटील कव्हेकर, गोटू यादव, संजय ओव्हळ,  सूर्यकांत कातळे, नागसेन कामेगावकर, सुनिल गायकवाड, अमोल शिंदे, विजयकुमार शिंदे, विश्वनाथ वाकुरे, मनोज चिखले, रघुनाथ मदने,  बाबा पठाण, विजयकुमार साबदे, शहाजी नलगे, अजय मोरे,  सतीश देवकते, वैजनाथ जक्कलवाड, करीम तांबोळी आदीसह  काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR