मंत्रालय सोसायटीत दीड कोटीचा घोटाळा

मुंबई : मंत्रालयीन कर्मचारी आणि शासकीय यंत्रणेशी संबंधित पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या दि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधील तब्बल १ कोटी ६६ लाख ९६ हजार ५१४ रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे मंत्रालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी चेअरमन, व्यवस्थापक, संचालक, पदाधिकारी तसेच लेखापरीक्षकांसह एकूण १० जणांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ ते २०२२ या पाच आर्थिक वर्षांतील संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत २०२३ मध्ये सहकार विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सहकार विभागाने विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ उमेश गोपीनाथ तुपे यांची फेरलेखा परीक्षणासाठी नियुक्ती केली होती. २८ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या फेरलेखा परीक्षणात विविध आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे सहकार आयुक्तांची परवानगी घेऊन मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न
फेरलेखा परीक्षणात वेतनातून कपात न केलेला आयकर संस्थेच्या निधीतून भरणे, लाभांश वाटपातील तफावत, आकस्मिक निधी व सभासद सहाय्य निधीतील कथित गैरव्यवहार, इमारत निधीतील नियमबा खर्च, सुवर्ण कर्ज प्रकरणातील अनियमितता तसेच शैक्षणिक शिबिरे, दिवाळी भेटवस्तू, वार्षिक सभा आणि फर्निचरवरील खर्च तक्रारीत नमूद आहे.

लेखा परीक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी
तत्कालीन पदाधिकारी आणि अधिका-यांसोबतच लेखा परीक्षण करणा-या व्यक्तींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून अहवाल तयार केल्याचा आरोप करत संबंधित लेखा परीक्षकांनाही आरोपी करण्यात आले आहे.

हजेरीपटात फेरफार
कर्मचा-यांच्या हजेरीपटात फेरफार करून नियमबा भत्ते वाटप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व बाबींची एकत्रित कथित आर्थिक रक्कम १ कोटी ६६ लाख ९६ हजार रुपये आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news