30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरअंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेत कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची निवड

अंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेत कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची निवड

लातूर : प्रतिनिधी
दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव या महाविद्यालयाच्या हॉकी संघातील सहा विद्यार्थ्यांची अंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुरेश ग्यानविहार जयपूर येथे खेळल्या गेलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी हॉकी स्पर्धेमध्ये बाभळगावच्या हॉकी संघाने हे यश संपादन केले. यामध्ये ऋषिकेश रेनके, मजर शेख, ओमकार भाडूळे, दत्ता गुंठे, अमन सुभेदार, फुलगामे अनमोल यांचा सहभाग होता. या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड अंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघातून प्रथम  आलेल्या संघामधून करण्यात आली होती.
या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव अध्यक्ष आमदार धीरज देशमुख, सचिव शाम देशमुख, संचालक, प्राचार्य डॉ. दुप्यंत कटारे, क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर, डॉ. नाना जाधव, डॉ. दशरथ भिसे, सर्व क्रीडा सल्लागार मंडळ, प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR