24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरअंमली पदार्थांपेक्षा ज्ञानाची नशा जोपासली पाहिजे

अंमली पदार्थांपेक्षा ज्ञानाची नशा जोपासली पाहिजे

लातूर : प्रतिनिधी
दारु, तंबाखू, गुटखा, अफू, चरस, गांजा, सिगारेट अशा प्रकारच्या अमली पदार्थांच्या सेवनाने व मोबाईल फोनमधील फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप च्या अतिवापराने युवा पिढी बर्बाद होऊ लागली आहे म्हणून अमली पदार्थांपेक्षा पुस्तक वाचनातून ज्ञानाची नशा जोपासली पाहिजे, असे मत लातूर शहराचे उप विभागीय पोलीस अधीक्षक भागवत फुंदे यांनी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे ‘अमली पदार्थ विरोधी’ जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त्त केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, दुसरे प्रमुख पाहुणे मनोविकारतज्ञ डॉ. शितल तळीखेडकर, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्याण सावंत, डॉ. प्रकाश रोडिया, प्रा. विजय गवळी, डॉ. स्वाती फेरे इत्यादी उपस्थित होते. उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लातूर शहर, शासकीय वैद्यकीय विभाग, जिल्हा परिषद, लातूर व शिव छत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय(स्वायत्त),  लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ जुलै रोजी ‘अमली पदार्थ विरोधी’ जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात  आली होती. या प्रसंगी ते बोलत  होते.  यावेळी डॉ. शीतल तळीखेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक प्रा. विजय  गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन  डॉ. भीमराव पाटील यांनी व  आभार डॉ. प्रकाश रोडिया यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR