भुवनेश्वर : मध्यम रेंजवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि १ चे ट्रेंिनग लॉन्च गुरुवारी यशस्वी ठरले. ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून याचे प्रक्षेपण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. या ट्रेंिनग लॉन्च दरम्यान सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंड यशस्वी ठरले आहेत.
अग्नि १ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज मध्यम स्वरुपाची अर्थात ७०० किमीपर्यंत आहे. तसेच या क्षेपणास्त्राचे वजन १२ टन असून ते आपल्यासोबत १,००० किलो अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतो. अग्नि १ क्षेपणास्त्राला अत्याधुनिक सिस्टिम प्रयोगशाळेने संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटरसह विकसित करण्यात आले आहे.
या क्षेपणास्त्राला हैदराबादस्थित भारत डायनॅमिक्स लिमिटेडने पूर्ण केले आहे. या क्षेपणास्त्राला सर्वात आधी सन २००४ मध्ये लोकार्पण झालं आहे. जमिनीवरुन जमिनीनार मारा करणा-या या क्षेपणास्त्राला मजबूत प्रॉपलँट्सद्वारे तयार करण्यात आले आहे.