38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमलिकांवरून घमासान

मलिकांवरून घमासान

फडणवीसांचे अजित पवारांना पत्र, विरोधकांनी कोंडीत पकडले

मुंबई : प्रतिनिधी
देशद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगातून बाहेर आलेले माजी मंत्री नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात दाखल झाले. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटात सामिल होणार, याची उत्सुकता लागली होती. मात्र, अखेर ते सत्ताधा-यांच्या बाकावर बसले. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याच मुद्यावरून विधान परिषदेत खडाजंगी झाली. या मुद्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावरून वादाची चिन्हे लक्षात घेऊन फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नये, अशी विनंती केली. यावरून नवाब मलिक यांची अडचण झाली आहे.

माजी मंत्री नवाब मलिक सत्ताधारी गटात सामिल होताच विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर यावरून थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. यावरून सभागृहात खडाजंगी झाली. तसेच सभागृहाबाहेरही थेट भाजपवर हल्लाबोल सुरू झाला. ही बाब अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहिले आणि त्यात सत्ता येते आणि जाते, पण देश महत्वाचा असल्याचे सांगत नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीत सामावून घेता कामा नये, असे म्हटले.

नवाब मलिक यांच्यासोबत आमची वैयक्तिक शत्रूता किंवा आकस नाही. परंतु त्यांच्यावर जे गंभीर आरोप आहेत, ते पाहता त्यांना महायुतीत सामावून घेऊ नये, असे पत्रात नमूद केले. या निमित्ताने आता महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप आहे.

मलिक यांना आमचा विरोध
पक्षात कोणाला घ्यायचे, याबाबत आम्ही बोलू शकत नाही. तो तुमचा सर्वस्वी अधिकार आहे. मात्र, यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस म्हणाले. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे.

तटकरेंचा सावध पवित्रा
आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आजारपणाच्या मुद्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही, असे ट्विट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. यावरून ते दोन पावले मागे सरकारल्याचे चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR