मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांनाच धक्का देत भापजशी घरोबा केला आणि पक्षही हिरावून घेतला. आता तेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आता तोंडखशी पडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दादांचा मित्रपक्षांकडूनच गेम केला जात असून, निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपच्या वाटेवर असून, ते ३ ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला असून, कमलेश सिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे झारखंडमधून राष्ट्रवादीचा सफाया होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेणारे आमदार कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदार संघाचे आमदार आहे. शिवाय ते पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. त्यामुळे राज्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या झारखंडमध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले असून, काही दिवसातच निवडणूकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अस्तित्वात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र लढवणार आहे. त्यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सामिल झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार यांना पक्ष आणि पक्ष चिन्ह देखील मिळाले. दरम्यान, आपन स्थापन केलेला पक्षच हिरावून घेतल्यामुळे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये ७ आमदार आणि संसदेत ३ खासदार आहेत. तर झारखंडमध्ये असलेला एकमेव आमदार आणि प्रदेशाध्यक्ष असलेले कमलेश सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे झारखंडमधून राष्ट्रवादी भूईसपात होण्याची शक्यता आहे.