27.2 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावरही पूर्णविराम येणार

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावरही पूर्णविराम येणार

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत, पण आता त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरही पूर्णविराम येणार आहे. ते आता उपमुख्यमंत्री बनू शकत नाहीत. कारण त्यांचे सरकार जात आहे. यानंतर ते आमदारही बनण्याची शक्यता कमी आहे. परंतु ज्या प्रकारचे हे लोक राजकारण करत आहेत, त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) खुलासा केला की, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे होते, परंतु उपमुख्यमंत्रिपदाच्या पलीकडे त्यांना प्रगती करता आली नाही.

राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी एका चर्चासत्रात म्हटले की, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मला पुढे जाता येत नाही. मला संधी मिळत नाहीय, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून महायुती सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार विक्रमी पाच वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR