17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना धक्का; सचिन खरात शरद पवार गटात

अजित पवारांना धक्का; सचिन खरात शरद पवार गटात

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे अजित पवारांच्या पक्षातील एकेक नेते शरद पवारांच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर आता दुसरीकडे राष्ट्रवादीला साथ देणारा मित्र पक्षही त्याच वाटेवरून जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देणा-या रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ते लवकरच शरद पवारांसोबत जाणार आहेत.
रिपब्लिकन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीत दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सचिन खरात म्हणाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आपण चर्चा केली असून लवकरच पुढचा निर्णय घेणार असल्याचे सचिन खरात यांनी म्हटले आहे.

राजेंद्र शिंगणे, रामराजे निंबाळकर साथ सोडणार
या आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांच्या भेटीला गेले असून त्यांनीही अजितदादांची साथ सोडण्याचे जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. त्याचसोबत येत्या १४ ऑक्टोबर रोजी फलटणचे रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या गटात परतणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आऊटगोईंग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR