Homeलातूरअटक टाळणे, ‘मदत’ करण्यासाठी पोलिसांनी घेतली ४५ हजारांची लाच

अटक टाळणे, ‘मदत’ करण्यासाठी पोलिसांनी घेतली ४५ हजारांची लाच

लातूर : प्रतिनिधी
तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यासंर्भाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यास ताब्यात घेतले. तसेच त्यांने उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना फोन करून  ‘भेट झाली’ अशी माहिती दिली, तसेच तक्रारदाराशी फोनवर बोलताना पुजारी यांनीही ‘पाठवून द्या, मदत करता येईल’ असे सांगत लाच स्वीकारण्यास दुजोरा दिला. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पोलिसांनी पडताळणी केली. २ एप्रिल रोजी पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत आरोपींनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सापळा रचण्यात आला. अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे सापळा कारवाईदरम्यान आरोपी पोह राहुल नागरगोजे याने ४५६ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला जागीच पकडले. विशेष म्हणजे, ही रक्कम पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या वतीने घेत असल्याचेही स्पष्ट झाले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी पुजारी यांना फोन करून ‘भेट झाली’ अशी माहिती दिली, तसेच तक्रारदाराशी फोनवर बोलताना पुजारी यांनीही ‘पाठवून द्या, मदत करता येईल’ असे सांगत लाच स्वीकारण्यास दुजोरा दिला.
कारवाईदरम्यान नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला, तर पोलिस निरीक्षक पुजारी यांच्याकडूनही मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या घरांची झडती सुरू आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करत  आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR