नगर पंचायतसमोर नगरसेवक लखनगावे यांचे उपोषण 

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या एका स्थापत्य अभियंत्यावर भ्रष्टाचार व मनमानी व गलथान कारभाराचे आरोप करीत त्यांच्याकडील पद्भार काढून घेण्यात यावा, या मागणीसाठी नगरपंचायतसमोर सुधीर नगरसेवक लखनगावे यांनी उपोषण सुरू केले आहे.
  नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याकडे २३ एप्रिल रोजी नगरसेवक सुधीर लखनगावे, पाणी पुरवठा सभापती उमाकांत देवंगरे, अर्थ व नियोजन सभापती सौ. श्रीदेवी संभाळे, माजी उपनगराध्यक्षा सौ. सुषमा मठपती, माजी सभापती संतोष शिवणे, श्रीमती पार्वती देवंगरे, सौ.रागिणी शिवणे निवेदन देऊन सदरील मागणी केली आहे.  शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या अतिरिक्त स्थापत्य अभियंत्याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला असून त्यांच्या कारभारात भ्रष्टाचार, मनमानी आणि कार्यालयीन पद्धत चुकीची असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत. या बाबत विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी यापूर्वीही त्यांच्या विरोधात अनेक लेखी तक्रारी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कडक कारवाई करण्यात आली नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यांचा शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीतील अतिरिक्त पदभार तात्काळ काढून घ्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास ३० एप्रिलपासून नगरपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरसेवकांनी निवेदनातून देण्यात आला होता. त्यानुसार नगरसेवक सुधीर लखनगावे हे उपोषणाला बसले असून जो पर्यंत स्थापत्य अभियंत्याचा पदभार काढून घेणार नाही तोपर्यंत आमरण साखळी उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाला शहरातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून या वेळी बस्वराज मठपती, बस्वराज शिवणे, महादेव आवाळे, अशोक कोरे, संदीप धुमाळे, भागवत नाब्दे, नामदेव लोखंडे, व्यंकट बेंबळगे, प्रतीक पारशेट्टे, चेतन मांदळे, सुरज आवाळे, विशाल सुगावे आदींनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news