29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeराष्ट्रीयअडवाणी यांची तब्येत बिघडली

अडवाणी यांची तब्येत बिघडली

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली असून, त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या अडवाणी ९६ वर्षे वयाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR