22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरअतनूर,घोणसी येथील गटाच्या महिलांचा लातुरात सत्कार

अतनूर,घोणसी येथील गटाच्या महिलांचा लातुरात सत्कार

जळकोट : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांच्या उत्पादनाचे विक्री व प्रदर्शन लातूर येथील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमात  जळकोट तालुक्यातील सहभागी अतनूर सिद्देश्वर गटाच्या नागीण स्वामी व घोंणशी येथील शिवशंभू गटाच्या चौत्रा नवाडे यांच्या विक्री व प्रदर्शनात सहभागाबद्दल प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
   लातूर येथे झालेल्या हिरकणी हाटमध्ये जिल्हास्तरीय महिला उद्योजिका आर्थिक सक्षमीकरण व कर्ज वितरण सोहळ्यात जळकोट तालुक्यातील महिला बचत गटाच्या यशस्वी उद्योजिकांचा प्रशस्तीपत्र देऊन  करण्यात आला. लातूर येथील क्रीडा संकुलात २६ ते ३० जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात तीन स्टॉल उभारून या तालुक्याचा उमेदने सहभाग नोंदवला. गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अंतर्गत विविध उपक्रम तालुक्यात राबवले जात आहे.
कार्यक्रमात संजिवनी गायकवाड, नागीण स्वामी, आशा खंडू शिंदे, सीमा आगलावे व सविता भुरे यांचा यशस्वी उद्योजिका म्हणून प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर व अन्य अधिका-यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कर्ज वितरणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुका कक्षाचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, तालुका व्यवस्थापक शीतल पुरी, गजेंद्र कलमे, प्रभाग समन्वयक अर्जुन पवार आदी अधिका-यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR