लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमानात अतिवृष्ठी झाल्याने शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शेतक-यांना अडचणींना सामोरे जात असताना जिल्ह्यातील नगदी पीक असलेले उस गाळप लवकर सुरू होणार आहे. आगामी गळीत हंगामात उस तोडणीसाठी मोठी कसरत करावी लागणार असून अनेक ठिकाणी उस आडवे पडलेले आहेत तर अनेक ठिकाणी जायलाच रस्ता राहिलेला नाही. तसेच अतीवृष्ठी झाल्याने उसाचे वजन वाढलेले नाही त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका बसू शकतो सध्या थंडी अजून सुरू नाही त्यामुळें उसाची तोडणी नोव्हेंबर मध्ये करावी त्यामुळें उसाचे वजन वाढेल शेतक-यांना आर्थिक दृष्ट्या अधिक मदत होईल अशी मागणी ऊस उत्पादक शेतक-यांकडून होत आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर असून यावेळी मोठया प्रमाणावर अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना बसलेला आहे. जवळपास ७५ टक्के पीकाचे नुकसान झालेले असून ऊस, सोयाबीन पिकांना मोठा फटका या अतिवृष्टी पावसामुळे झालेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून एकीकडे शेतक-यांना सरकारकडून अद्यापही मदत मिळालेली नसताना ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर असून अनेकांचा ऊस अजूनही पाण्यात उभा आहे. तर अनेकांचे उसाच्या फडात जायला रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. यासाठी साखर कारखान्यानी ऊसाचे गाळप नोव्हेंबर मध्ये सुरू करावे जेणेकरून ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस तोडणी पर्यंत ऊसाचे टनेज वाढेल तो पर्यंत थंडी सुरू होईल शेतक-याच्या उसाचे वजन वाढल्याने चार पैसे जास्त मिळतील अशी अपेक्षा असून अशी मागणी जिल्ह्यातील उस उत्पादक शेतक-यांची आहे.