21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरअधिग्रणांची संख्या पोहचली ५०० पार

अधिग्रणांची संख्या पोहचली ५०० पार

लातूर : प्रतिनिधी
वैशाख महिण्याच्या अखेरीस तापमानाचा पारा आवकाळी पावसामुळे कांहीसा कमी झाला असला तरी ढगाळ वातावणामुळे मात्र सर्वांची तगमग होत आहे. जून उजाडला तरी जिल्हयात सध्या ४४२ गावे, ८२ वाडया, तांडयावर पाणी टंचाईच्या झळा कमालीच्या  जानवत आहेत. पावसाळयाच्या तोंडावर पाणी टंचाईची तीव्रता वाढत आसून आज घडीला ४१५ गावे व वाडयांवर ५१९ अधिग्रहणाद्वारे नागरीकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
लातूर जिल्हयात जसा-जसा पावसाळा जवळ येत आहे, तशी-तशी पाणी टंचाईची तीव्रता ग्रामीण भागात अधिक जाणवत आहे. जिल्हयात सध्या तुरळक ठिकाणी आवकाळी पावसाची हजेरी दिसून येत असली तरी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना पाणी वाढ होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गेल्यावर्षी पाऊस सरासरी पेक्षा कमी झाल्याने यावर्षी जानेवारीपासूनच ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत  आहे.  एप्रिल व मे महिण्यातही पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. सध्या पावसाळा तोंडावर आला तरी पाणी टंचाईचे संकट कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतानाच दिसून येत आहे.
आज घडीला पाणी टंचाई जाणवणा-या ग्रामपंचायतींनी ५२४ गावांसाठी, ८२ वाडयांसाठी ७६५ अधिग्रहणाद्वारे नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे पाठवले होते.  सदर प्रस्तावांची पाहणी करून पंचायत समिती स्तरावरून तहसिल कार्यालयाकडे ४०२ गावे, ६९ वाडयांना ६२५ अधिग्रहणाची गरज असल्याचे कळवण्यात आले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयांनी  पाहणी करून ३५५ गावे, ६० वाडयांना ५१९ अधिग्रहण मंजूर केले आहेत. त्यामुळे ४१५ गावे, वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR