22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरअनधिकृत होर्डिंग प्रकरणी एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल

अनधिकृत होर्डिंग प्रकरणी एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल

लातूर : प्रतिनिधी
शहरातील अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी मनपाने रविवार पर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत संपताच सोमवारी एकाच दिवशी अशा ११ अवैध होर्डिंग संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. महानगरपालिकेने एकाच दिवसात ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण १५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मनपाने सोमवारी २  होर्डिंग व १५ अनधिकृत  बॅनर काढूनही टाकले.  अवैध होर्डिंग प्रकरणात मनपाने कारवाई सुरु केली आहे. त्याअनुषंगाने उपायुक्त्तत डॉ. पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी आणि मालमत्ता व्यवस्थापकांची बैठक घेतली. कार्यवाहीला गती देवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत त्यांनी आदेशित केले. होर्डिंग प्रकरणात प्रारंभी पालिकेच्या वतीने संबंधित एजन्सी व मालमत्ता धारकांना अवैध होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी रविवार पर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत काही एजन्सी व मालमत्ताधारकांनी अवैध होर्डिंग काढून घेतले. परंतु तरीही अवैध होर्डिंग शिल्लक राहिल्याने सोमवारी महानगरपालिकेने धडक कारवाई सुरु केली.एकाच दिवसात २० बाय ३० फुट आकाराचे दोन होर्डिंग व १५ बॅनर महानगरपालिकेने निष्कासित केले. मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधितांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले.
शहरातील ज्या मालमत्तांवर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहेत ते संबंधितांनी स्ट्रक्चरसहित तात्काळ काढून घ्यावेत.असे होर्डिंग निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारक व एजन्सी धारकावर क्षेत्रीय कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या होर्डिंगमुळे एखादी दुर्घटनाकिंवा अपघात झाल्यास मालमत्ताधारक व एजन्सी धारकावर कार्यवाही करण्याचा इशारा मनपा उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांनी दिला आहे.मालमत्ता धारक व एजन्सी धारकांनी अवैध होर्डिंग तात्काळ काढून घेत मनपाला सहकार्य करावे,असे आवाहनही पालिकेने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR