अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणासाठी पुणे-मुंबई लाँग मार्च 

लातूर : प्रतिनिधी
अनुसूचित जातीतील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा तसेच सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात यावे आणि  सामाजिक न्याय व सलोखा कायम राखावा, या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पुणे ते मुंबई असा  लॉग मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी बाबा साळवे यांच्या समाधीस्थळापासून १७ जून रोजी या लॉग मार्चला प्रारंभ होणार असून २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य मोर्चा व आंदोलनाने त्याची सांगता होणार आहे.  या आंदोलनाचे नेतृत्व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे, नातू सचिनभाऊ साठे, गणेशभाऊ भगत, अण्णा भाऊ साठे यांची नाती व नातजावई, अ‍ॅड. टी. एन. कांबळे आणि राज क्षीरसागर हे करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी राज क्षीरसागर अ‍ॅड. टी. एन. कांबळे, सुरेश चव्हाण, आनंद वैरागे, डी. एल. वाघमारे, सचिंद्र कांबळे, किशोर शिंदे, पिराजी साठे, अशोक गायकवाड, नेताजी मस्के, राहुल क्षीरसागर, विजय गव्हणे, राहुल घोलप, अर्जुन बावरी, नारायण जोगदंड, सुनील जोगदंड, आकाश लोंढे, सूरज लोंढे, श्रीधर आवळे आदी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news