36 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeनांदेडअन् १५ मिनिटांच्या अंतराने आमचा जीव वाचला

अन् १५ मिनिटांच्या अंतराने आमचा जीव वाचला

नांदेडच्या दाम्पत्याकडून पहलगाम हल्लाचा थरारक अनुभव कथन

नांदेड : प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सुदैवाने घटनास्थळापासून केवळ १५ मिनिट अगोदर निघाल्याने आणि स्थानिकांनी मदत केल्याने आम्हचा जीव वाचला, असा थरारक अनुभव नांदेड येथील लोलगे दाम्पंत्याने कथन केला.

नांदेड येथील कृष्णा मधुकर लोलगे व साक्षी कृष्णा लोलगे हे दाम्पत्य एका एजन्सीकडून काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. हे दाम्पत्य पहलगाम येथे होते, त्याच दिवशी मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. यात २८ जणांना मृत्यू झाला. याच हल्ल्यातून सुखरूप परतलेल्या लोलगे दाम्पत्याने आपला थरारक अनुभव कथन केला.

यावेळी कृष्णा व साक्षी लोलगे म्हणाले, दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी आम्ही पहलगाम येथेच होतो. केवळ १५ मिनीटे अगोदर तेथून आम्ही निघाले आणि नंतर हा हल्ला झाला. तेव्हा आमच्या सोबत असलेले घोडस्वार, चालक यांनी तातडीने आम्हाला हॉटेलवर नेले. तेथे स्थानिकासह इतरांनी धीर दिला, मदत केली. शासनाच्या प्रतिनिधींनीकडून आपण सुरक्षिर आहेत का याबाबत वारंवार विचारणा झाली. या सर्वाच्या मदतीमुळे आम्ही पहलगाम येथून सुखरूप बाहेर पडलो आणि आमचा जीव वाचला, अशी भावना एका व्हीडीओच्या माध्यमातून बोलताना लोलगे दाम्पत्यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR