निलंगा : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अभय साळुंके यांची निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे निलंगा शहरात आगमन झाल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी तोबा गर्दी करीत अभिनंदन केले .
काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके दि ३१ जुलै रोजी गुरुवारी शहरात दाखल होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. तद्नंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, दादापीर व पिरपाशा दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आले. बार असोसिएशनच्या वतीने निलंगा कोर्टात अध्यक्ष अॅड प्रविण भोसले, अॅड. तिरुपती शिंदे, अॅड. नारायण सोमवंशी, अॅड. जगदीश सुर्यवंशी, अॅड. अजित माकणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तद्नंतर ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जिजाऊ चौकातील काँग्रेस भवन कार्यालयासमोर आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांचा निलंगा मतदारसंघातील निलंगा, शिरुर अनंतपाळ व देवणी तालुक्यातून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभय साळुंके यांचा जंगी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कार करण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयकुमार पाटील, शिरूरअनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणीचे तालुकाध्यक्ष अॅड. अजित बेळकोणे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी प.स.सभापती अजित माने, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, आंबादास जाधव, पंकज शेळके, विठ्ठल पाटील, महेश देशमुख, शकील पटेल, माधवराव पाटील, गिरीश पात्रे, तुराब बागवान, दिनकर बिरादार, अजित निंबाळकर, बालाजी वळसांगवीकर, गोविंद सुर्यवंशी, प्रमोद मरुरे, किशोर कारखाने, अजय देशमुख, महावीर काकडे, मदन बिरादार, आवेज हमीद शेख, अमित नितनवरे, राजकुमार सोमवंशी, जगदीश सगर, विकास पाटील, संदीपान जाधव, दत्ता जाधव, हाजी सराफ, गोरख नवाडे, अमोल सोनटक्के, धनाजी चांदूरे, बालाजी गोमसाळे, गफार लालटेकडे, औदुबर पांचाळ, चेअरमन गंगाधर चव्हाण, सरपंच सोहेल पठाण, प्रशांत नखाते, राजाप्पा वारद, पद्मसिंह पाटील , महेश देशमुख , बाब्रुवान जाधव आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते व त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.